History

History2019-05-30T07:06:29+00:00

इतिहास

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात एकत्र आलेला मराठी आवाज महाराष्ट्र राज्याच्या स्थापने नंतर मात्र काहीसा विखुरला गेला होता. याच दरम्यान मुंबईसह महाराष्ट्र व्हावा म्हणून १०५ जणांनी हुतात्मा पत्करलेल्या मुंबईत मात्र स्थलांतर, परप्रांतीयांचे प्रमाण वाढीस लागून मराठी मुलुकात मराठी माणसाचीच अवहेलना, कुचंबना होत असल्याच्या धर्तीवर त्याच सुमारास सुरु झालेल्या मार्मिक या व्यंगचित्र आधारीत साप्ताहिकातून प्रबोधनकार ठाकरे यांचे सुपुत्र व्यंगचित्रकार बाळ ठाकरे यांनी समाजाच्या आणि विशेष करून तरुणांच्या मनातील खदखद जाणून आपल्या कुंचल्याच्या फटकाऱ्यातून मराठी माणसांवरील अन्यायाला वाचा फोडण्याचे कार्य हाती घेतले. बाळासाहेबांच्या या कार्यास लोकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याचे पाहून भूमीपुत्रांच्या न्याय्य हक्कासाठी लढणारी संघटना असावी या विचारातून १९ जून १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना झाली.

Timeline

१९७२ & १९७३ १९७२ & १९७३
१९७८ १९७८
१९८९ १९८९

१९७२ & १९७३

१९७२ साली स्थानीय लोकाधिकार समितीची स्थापना झाली आणि शिवसनोप्रमुखांनी विधानसभा निवडणुकीचे धोरण जाहीर केले. १९७३च्या निवडणुकीत शिवसेनेचे ३९ नगरसेवक निवडून आले व वयाच्या ३२व्या वर्षी तरुण महापौर होण्याचा मान सुधीर जोशी यांना मिळाला.

१९७८

१९८५ साली महाड अधिवेशनात साहेबांनी रणशिंग फुंकले. त्याचेच फलित जणू १९८६ साली बॉम्बेचे ‘मुंबई’ झाले.

१९८९

२३ जानेवारी १९८९ साली मुखपत्र ‘सामना’ सुरू केलं आणि शिवसेनेचा आवाज जो बुलुंद होताच तो घराघरात पोहचला. १९८९ सालच्या साहेबांच्या मराठवाड्या दौऱ्यानंतर जनतेनेच साहेबांना हिंदुह्रिदयसम्राट ही पदवी दिली आणि त्याचवर्षी शिवसेनेला धनुष्य-बाण हे कायमस्वरूपी चिन्ह मिळणे हे आईभवानीचेच कल्पित.

Leaders

श्रीमती. दुर्गा शिंदे

श्रीमती. दुर्गा शिंदे

Secretary
श्री. पूर्वेस सरनाईक

श्री. पूर्वेस सरनाईक

Secretary
श्री. वरुण सरदेसाई

श्री. वरुण सरदेसाई

Secretary
श्री. अमोल कीर्तिकर

श्री. अमोल कीर्तिकर

General secretary
Show Buttons
Hide Buttons